महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

माहूरगडची स्वराली जाधव बनली 'सूर नवा ध्यास नवा'ची विजेती!

'सूर नवा ध्यास नवा'चा महाअंतिम सोहळा मुंबई येथे ३ फेब्रुवारीला संपन्न झाला. या सोहळ्यात अवघ्या १३ वर्षाची स्वराली विजेती ठरली आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून आपले वडील व संगीतातील तिचे गुरू राजू जाधव यांच्याकडून तिने संगीताचे धडे गिरवीले आहे.

स्वराली

By

Published : Feb 4, 2019, 11:52 AM IST

नांदेड - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी रिअॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा'चा महाअंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्याकडे अनेक रसिकांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्रातील अनेक छोटे सूरवीर यात सहभागी झाले होते. या शोची महाविजेती बनण्याचा मान माहूरगडच्या स्वराली राजू जाधवला मिळाला आहे. आपल्या सूफियाना आणि बुलंद आवाजाची छाप तिने प्रेक्षकांवर पाडली होती. मानाची 'सुवर्णकट्यार' जिंकून 'महाराष्ट्राची राजगायिका' होण्याचा बहुमान तिने प्राप्त केला आहे.

'सूर नवा ध्यास नवा'चा महाअंतिम सोहळा मुंबई येथे ३ फेब्रुवारीला संपन्न झाला. यात अवघ्या १३वर्षाची स्वराली विजेती ठरली आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासुन आपले वडील व संगीतातील तिचे गुरू राजू जाधव याच्याकडून संगीताचे धडे गिरवीले आहे.


जुलै २०१८ मध्ये 'सूर नवा ध्यास नवा'(छोटे सूरवीर) या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, रत्नागीरी, कोल्हापूर या शहरांमध्ये ६ ते १५ वयोगटातील स्पर्धकांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. यात ६ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ सत्तर गायकांना मेगा ऑडीशन करिता मुंबई येथे बोलावण्यात आले होते. नागपूर केंद्रावरून सहाशे गायकांपैकी निवड झालेल्या केवळ ८ गायकांमध्ये स्वरालीची निवड करण्यात आली होती.

पुढे मुंबई येथील मेगा ऑडीशनमधून महेश काळे, गायक- संगीतकार अवधुत गुप्ते आणि गायिका शाल्मली खोलगडे या परिक्षकांनी केवळ एकवीस गायकांची या शो करिता निवड केली होती. त्यानंतर ६ गायकांचे एलिमिनेशन झाल्यानंतर ऊर्वरीत पंधरा गायकांची ३ गटात विभागनी करण्यात आली होती. यात 'सूरसेना' (अवधुत गुप्ते), 'सूरीले' (शाल्मली खोलगडे), 'सूराधीश' (पं.महेश काळे) असे ३ कॅप्टन नियुक्त करण्यात आले होते. महेश काळे यांच्या 'सूराधीश' टीममध्ये स्वरालीची निवड झाली होती. तेव्हापासून सतत ६ महिने उत्तरोत्तर ऊत्कंठा शिगेला पोहचविणारा हा सूरसंग्राम चालु होता.


या संपुर्ण पर्वामध्ये स्वरालीने तिच्या आवाजाच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या. अनेक मातब्बर गायकांची गाणी तिने सहजरित्या गायली. स्वराली कधीही बॉटम मध्ये आली नाही. 'बेस्ट परफॉर्मर' ठरत दोन वेळेला तिने मानाची सुवर्णकट्यार पटकावली. सर्वात प्रथम महाअंतीम फेरीत पोहचणारी ती एकमेव गायिका ठरली होती.


ग्यानबाजी केशवे विद्यालय माहूर येथे इयत्ता सातवीत शिकणारी स्वराली शास्त्रीय गायना सोबतच सुफी, गज़ल, ठुमरी,लावणी ,लोकगीते , भक्तिसंगीत ,कव्वाली या गायन प्रकाराचा रियाज आपल्या गुरूच्या मार्गदर्शनात करत आहे.
एवढ्या लोकप्रिय शो ची महाविजेती ठरलेली स्वराली ही मराठवाडा आणि विदर्भातील आत्तपर्यंतची एकमेव बालगायिका ठरली आहे. सुविख्यात गायिका पद्मविभुषण आशा भोसले यांचे हस्ते स्वरालीला महापुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूप सुवर्णकट्यार ,एक लाख रूपये रोख तसेच अमेरिकेतील 'नासा' आणि डिस्नीलँडला भेट असे आहे. संपुर्ण महाराष्ट्रातून स्वराली राजू जाधव वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details