मुंबई - स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांची मुख्य भूमिका असलेला 'मोगरा फुलला' या सिनेमाचा भव्य ट्रेलर आणि म्युजिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी या सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. आई मुलगा आणि त्याच्या आयुष्यात आलेली एक नवीन स्त्री यांच्याभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात अली आहे.
'सरकारनामा', 'लपंडाव' यासारखे एकाहून एक सरस सिनेमे देणाऱ्या श्रावणी देवधर यांचा दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'मोगरा फुलला' हा सिनेमा येत्या १४ जूनला रिलीज होतोय. नातेसंबंधांवर भाष्य करणारी अशी ही एक कथा आहे. सचिन मोटे लिखीत या सिनेमात स्वप्नील जोशी हा पहिल्यादा एका नॉन ग्लॅमरस अशा भूमिकेत दिसणार आहे. डोळ्यापुढे चालणारा सरळमार्गी सुनील कुलकर्णीच्या व्यक्तिरेखेत तो आपल्याला दिसणार आहे. याशिवाय सई ही श्रावणी आणि देबु देवधर यांची कन्या असली तरीही मराठीत पहिल्यांदाच पदार्पण करत आहे. या दोघांशिवाय अभिनेत्री नीना कुलकर्णी यादेखील या सिनेमात सुनीलच्या आईच्या भूमिकेत दिसतील.