महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुष्मिताने बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलला केलं अनफॉलो, ब्रेकअपच्या चर्चांना उधाण - break up

रोहमन हा सुष्मितापेक्षा तब्बल १५ वर्षांनी लहान आहे. आत्तापर्यंत बऱ्याच कार्यक्रमांमध्ये दोघेही एकत्र दिसले. सुष्मिता नेहमी दोघांचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते.

सुष्मिताने बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलला केलं अनफॉलो, ब्रेकअपच्या चर्चांना उधाण

By

Published : Jun 27, 2019, 12:52 PM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांच्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या चर्चा रंगताना दिसतात. अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल यांच्यादेखील नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. सुष्मिताने रोहमनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तसेच रोहमनच्यादेखील इन्स्टास्टोरीमुळे त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचे समजते आहे. बऱ्याच काळापासून सुष्मिता आणि रोहमन एकमेकांना डेट करत होते.

रोहमन हा सुष्मितापेक्षा तब्बल १५ वर्षांनी लहान आहे. आत्तापर्यंत बऱ्याच कार्यक्रमांमध्ये दोघेही एकत्र दिसले. सुष्मिता नेहमी दोघांचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल

एकमेकांसोबत व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. ते दोघे अलिकडेच तिच्या भावाच्या लग्नातही एकत्र दिसले. तर, रोहमन तिच्या दोन्ही दत्तक मुलींचीदेखील काळजी घेताना दिसत होता. मग, असे काय झाले की सुष्मिता आणि त्याच्या नात्यात दुरावा आला? असा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल

सुष्मिताने इन्स्टाग्रामवर रोहमनला अनफॉलो केल्यानंतर रोहमनने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवरुन देखील सुष्मिता त्याच्यासोबत बोलत नसल्याचे समजते. त्यामुळे रोहमन भावुक झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details