महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

साश्रुनयनांनी बिग बॉस मराठीच्या घरामधून सुरेखा कुडची बाहेर! - बिग बॉस मराठी सिझन तिसरा

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये या आठवड्यात सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या आठ जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. आता बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून सुरेखा कुडची घराबाहेर पडल्या आहेत.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा
बिग बॉस मराठी सिझन तिसरा

By

Published : Oct 18, 2021, 3:35 PM IST

प्रेक्षकांना माहीतच आहे की आता बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या आठ जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

बिग बॉस मराठी सिझन ३ च्या या आठवड्यातील बिग बॉसची चावडीमध्ये आले होते बिग बॉस मराठीच्या मागील पर्वातील दोन लोकप्रिय, TOP २ स्पर्धक ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सिझन २ चा विजेता शिव ठाकरे आणि दुसरे स्थान पटकावलेली नेहा शितोळे. त्यांनी स्पर्धकांची कानउघडणी केली, रोज डे सेलिब्रेट केला. बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली तर चुगली बूथद्वारे सोनाली पाटीलला तिच्याविरुध्द सदस्य जे बोलत होते ते तिच्या फॅनने सांगितले. जय आणि आदिशचा रोमॅंटिक डान्स बघायला मिळाला. तर, सदस्यांनी एकमेकांनबद्दल असलेल्या तक्रारी सदस्यांना सांगितल्या.

एलिमिनेशन साठी शेवटी स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची डेंजर झोनमध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केलेकी, या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागतेय. तृप्ती देसाई, स्नेहा, जय आणि घरातील इतर सदस्यांना अश्रु अनावर झाले. आता बिग बॉस मराठी च्या घरात कॅप्टन कोण होतो, नॉमिनेट कोण कोण होतात आणि कोणते टास्क खेळले जातात हे पुढच्या आठवड्यात कळेलच.

बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून सुरेखा कुडची घराबाहेर पडल्या आहेत. त्यावर सुरेखा कुडची म्हणाल्या, “या घरामध्ये माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. परिस्थितिमुळे होतं तसं. पण, मी ठरवलं होतं जेव्हा मी एलिमनेट होईन तेव्हा मी रडणार नाही. पण या घरामध्ये काहीतरी जादू आहे”. महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना विशेष अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवले.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेहील वाचा -‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने एक कोटी सबस्क्राइबर्सचा आकडा केला पार!

ABOUT THE AUTHOR

...view details