मुंबई - मनोरंजनसृष्टी आणि स्टाईल नेहमी हातात हात घालून चालत असते. सहसा मनोरंजनसृष्टीतील प्रत्येक कलाकार भूमिकेनुसार पडद्यावर कसाही दिसला तरी खाजगी आयुष्यात ग्लॅमरस राहण्याचा प्रयत्न करीत असतो. समाज माध्यमांवर अनेक कलाकार सक्रिय असतात आणि ते आपल्या खाजगी आयुष्यातील फोटो पोस्ट करीत असतात. फॅन्ससाठी ही पर्वणी असते आणि त्यांना कलाकारांची दोन्ही रूपं आवडत असतात. याबाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका मन झालं बाजींद मधील नायिका कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात.
‘मन झालं बाजींद’ मधील अभिनेत्री श्वेता खरातचे परस्परविरोधी लूक्स! - श्वेता खरातचे जबरदस्त लूक्स
मालिका मन झालं बाजींद मधील नायिका कृष्णा म्हणजेच अभिनेत्री श्वेता खरात सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. साधेपणातच सौंदर्य आहे हे कृष्णाकडे पाहून कळतं. पण कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात ही खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे आणि तिचं हे रूप देखील चाहत्यांना खूप आवडतं.
श्वेता खरात
श्वेता खरात सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. साधेपणातच सौंदर्य आहे हे कृष्णाकडे पाहून कळतं. पण कृष्णाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता खरात ही खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे आणि तिचं हे रूप देखील चाहत्यांना खूप आवडतं.
हेही वाचा -सौंदर्यवती गोल्फर पायगे रेने स्पिरोनाकचे जबरदस्त फोटो