कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी किंग खानने वापरला हटके फंडा, पाहा व्हिडिओ - SRK on CORONA awareness
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाशी लढा देण्यासाठी कशाप्रकारे खबरदारी बाळगावी, यासाठी किंग खानने हटके फंडा वापरत आपल्या काही चित्रपटांतील सीन घेऊन जनजागृती केली आहे.
कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी किंग खानने वापरला हटके फंडा, पाहा व्हिडिओ
मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता नागरिंकामध्ये जनजागृती करण्यासाठी कलाविश्वातील बरेच कलाकार एकवटले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाशी लढा देण्यासाठी कशाप्रकारे खबरदारी बाळगावी, याबद्दल कलाकार माहिती देत आहेत. अभिनेता शाहरुख खान यानेही एका व्हिडिओद्वारे नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्याने हटके फंडा वापरत आपल्या काही चित्रपटांतील सीन घेऊन जनजागृती केली आहे.