महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार 'चोर बाजार' साप्ताहिक कार्य ! - special task

मंगळवारपासून घरामध्ये 'चोर बजार' हे साप्ताहिक कार्य रंगले आहे. हे कार्य दोन दिवस असून या कार्यात दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार 'चोर बाजार' साप्ताहिक कार्य !

By

Published : Jun 5, 2019, 1:02 PM IST

मुंबई- बिग बॉस मराठीच्या घरात नवनवीन टास्क बिग बॉस देत असतात. जे कधी मजेदार आणि कधी आव्हानात्मक असतात. मंगळवारपासून घरामध्ये 'चोर बजार' हे साप्ताहिक कार्य रंगले आहे. हे कार्य दोन दिवस असून या कार्यात दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहेत.

म्हणजेच टीम A आणि टीम B. टीम A चे सदस्य आज चोर असणार आहेत तर टीम B चे पोलीस आणि दुकानदार. चोरांनी दुकानदार आणि पोलिसांच्या गोष्टी चोरायच्या आहेत आणि त्या दुसऱ्या दुकानदारांना विकायच्या आहेत. दुसरीकडे दुकानदारांनी जास्तीत जास्त गोष्टी विकत घ्यायच्या आहेत, तर पोलिसांनी चोरी होण्यापासून रोखायचे आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार 'चोर बाजार' साप्ताहिक कार्य !

आता या टास्कमध्ये कोणती टीम विजयी ठरेल हे बघणे रंजक असणार आहे. सदस्यांना मिळणारे टास्क ते कशाप्रकारे पार पडतात ही शोमधील महत्त्वाची बाब असते. तेव्हा बघू हे सदस्य कसा पार पडतील आजचा हा टास्क.

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार 'चोर बाजार' साप्ताहिक कार्य !

ABOUT THE AUTHOR

...view details