नवी दिल्ली- अमेरिकन पॉप स्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केल्यापासून बॉलिवूड सेलेब्सच्या प्रतिक्रिया सतत सोशल मीडियावर येत आहेत. आता प्रसिद्ध अभिनेता आणि गायक दिलजित दोसांझ याने रिहानावर एक गाणे तयार केले आहे, हे रिलीज होताच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते व्हायरल होत आहे. दिलजित दोसांझ यांनी रिहानावर बनवलेल्या गाण्याला 'रिरी' असे शीर्षक दिले आहे.
दिलजीत दोसांझ यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रिहानावर रचलेल्या गाण्याची माहिती दिली आहे. त्याने गाण्याच्या काही ओळी चाहत्यांमध्येही शेअर केल्या आहेत. दिलजित दोसांझचे हे गाणे काही तासांत 4 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. 'रिरी' गाणे राज रणजोध यांनी लिहिली आहेत, तर संगीत इंटेन्स यांनी दिले आहे. दिलजित दोसांझच्या या गाण्याला चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.