महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं गाणं 'बाप्पा मोरया'! - गीतकार समृद्धी पांडे

सध्या गणपती बाप्पावर आधारित अनेक नवीन गाणी बाजारात आली असून त्यातीलच एक आहे पिकल म्युझिक चं ‘बाप्पा मोरया’ हे गाणं जे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं असेल. विलेपार्ले येथील बस ईन स्टुडिओमध्ये रेकॅार्ड करण्यात आलेलं 'बाप्पा मोरया' हे गाणं पालघर येथील गणेश चित्रशाळेत चित्रित केलेलं आहे.

गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं गाणं 'बाप्पा मोरया'!
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं गाणं 'बाप्पा मोरया'!

By

Published : Sep 13, 2021, 5:51 PM IST

गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या आघातामुळे लागलेल्या लॉकडाऊन मुळे कोणताही सण सार्वजनिकरित्या साजरा करता आला नव्हता. दरवर्षी होणारे गणपती बाप्पाचे आगमन सर्वांमध्ये उत्साह भरतो. अनेकजण गेल्यावर्षीची कसर यावर्षी भरून काढताना दिसताहेत. तसेच गणेशोत्सव सांगीतिकरीत्यासुद्धा जोशात साजरा होताना दिसतोय. सध्या गणपती बाप्पावर आधारित अनेक नवीन गाणी बाजारात आली असून त्यातीलच एक आहे पिकल म्युझिक चं ‘बाप्पा मोरया’ हे गाणं जे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं असेल.

सध्याच्या काळात गणरायाची उडत्या चालीवरील धम्माल गाणी ऐकायला मिळतात. संगीतप्रेमींसाठी भक्तीमय नजराणा देणारं हे गाणं त्यापेक्षा खूप वेगळं आहे. बाजारपेठा सजल्या, हायवेवर वाहनांची वर्दळ वाढली, चाकरमान्यांची घाई-गडबड सुरू झाली, निसर्गही साज-श्रृंगार लेऊन नटलाय. 'ऑल इज सेट टू वेलकम बाप्पा', असं म्हणत तरुण पिढीही विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागताला सज्ज झाली आहे. या वातावरणात संगीत क्षेत्रासाठी कार्यरत असणाऱ्या पिकल म्युझिक कंपनीनंही पुढाकार घेत गणेशभक्तांसाठी एक आगळीवेगळा नजराणा पेश केला आहे.

गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं गाणं 'बाप्पा मोरया'!

'झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे...' या शब्दरचनांप्रमाणे मागील गणेशोत्सवाचे दिवस विसरून यंदाचा सोहळा आनंदात साजरा करण्याच्या उद्देशानं अतिशय सुंदर शब्दरचना असलेलं व तितक्याच सुरेल चालीत बांधलेलं गाणं निर्माते दत्ता मदन यांनी 'बाप्पा मोरया'च्या माध्यमातून सादर करण्यात आलं आहे. विलेपार्ले येथील बस ईन स्टुडिओमध्ये रेकॅार्ड करण्यात आलेलं 'बाप्पा मोरया' हे गाणं पालघर येथील गणेश चित्रशाळेत चित्रित केलेलं आहे.

गीतकार समृद्धी पांडे यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गीत संगीतकार मयुरेश माडगांवकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. दत्ता मदन यांनी हे गाणं गायलं असून, संगीत संयोजनही त्यांनीच केलं आहे. या गाण्यासाठी सनईवर ओमकार धुमाळ यांनी, तर तालवाद्यांवर चेतन परब यांनी साथ केली आहे. प्रोग्रामिंग प्रसाद परसनाईक यांनी केलं असून, बस ईन स्टुडिओतील सौरभ काजरेकर आणि विराट भूशेट्टी यांचं रेकॅार्डिंगसाठी सहकार्य लाभलं आहे. मिक्सिंग आणि मास्टरिंग केवल वाळंज यांनी केलं आहे, तर चलचित्रकार फिल्मचे सुशांत गावड हे व्हिडिओग्राफर आहेत. मनोज पाटील यांनी या गाण्याचे व्हिडिओ एडिटर म्हणून काम पाहिलं आहे.

अल्पावधीतच संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झालेल्या समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकनं 'बाप्पा मोरया' हे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं गाणं रसिकांच्या सेवेत सादर केलं आहे.

हेही वाचा - या उद्योगपतीच्या बायोपिकसाठी गुलजार-रहमान पुन्हा येणार एकत्र

ABOUT THE AUTHOR

...view details