सिंगिंग रियालिटी शोमधून पुढे आलेला गायक अभिजीत कोसंबीला ‘पिरमाची गोडी लागलीया’. म्हणजे तो एक नवंकोरं गाणं घेऊन आलाय त्याचे हे शब्द आहेत. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित होत आहे. राहुल सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या गाण्याला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे. देवबागच्या नितांत सुंदर परिसरात म्युझिक व्हिडिओचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.
अनेक उत्तमोत्तम गाणी दिलेला गायक अभिजीत कोसंबी आता नवं गाणं घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. गाण्याचे बोल आहेत.."पिरमाची गोडी लागलीया.." या गाण्याची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे, तर बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. देव झुंबरे, तेजल जावळकर आणि सुरभी सामंत यांच्यावर हे गाणं चित्रीत झालं आहे. अमोल गोळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. तर गुरु पाटील आणि महेश किल्लेदार यांनी म्युझिक व्हिडिओचं संकलन केलं आहे.