मुंबई- लोकप्रियतेचे शिखर गाठलेला आणि प्रत्येक घरा घरात पोहोचलेल्या कौन बनेगा करोडपती या शोमधील कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये काही नामांकीत व्यक्ती हजेरी लावणार आहेत. आज (शुक्रवारी) होणाऱ्या केबीसीच्या या स्पेशल एपिसोडमध्ये अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळ उपस्थित राहणार आहेत.
कर्मवीर स्पेशल, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ लावणार केबीसीमध्ये हजेरी
बच्चन यांच्याशी बातचीत करताना सिंधुताई नेहमी गुलाबी रंगाचीच साडी का घालतात, इथपासून पतीनं सोडल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळली आणि याची सकारात्मक बाजू पाहिली याबद्दल सांगताना दिसतात.
सोनीच्या अधिकृत अकाऊंटवरुन याबद्दलचा एक फोटो शेअर केला आहे. हजारो अनाथ मुलांची माय असलेल्या सिंधुताई कर्मवीर स्पेशलच्या पहिल्याच एपिसोडच्या खास पाहुण्या असणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो शेअर करण्यात आला असून यात सिंधुताई यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दलची माहिती देत आणि त्यांच्या पाया पडत बच्चन यांनी त्यांचे मंचावर स्वागत केल्याचे दिसत आहे.
यात बच्चन यांच्याशी बातचीत करताना सिंधुताईं त्या नेहमी गुलाबी रंगाचीच साडी का घालतात इथपासून पतीनं सोडल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळली आणि याची सकारात्मक बाजू पाहिली याबद्दल सांगताना दिसतात. याचसारखे त्यांच्या जीवनातील अनेक किस्से जाणून घेण्यासाठी नारी शक्तीचं उत्तम उदाहरण असलेल्या सिंधुताईंच्या या खास एपिसोडची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत.