महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिद्धार्थ आणि कियाराची जमणार जोडी, 'या' चित्रपटासाठी येणार एकत्र - kargil

कारगील युद्धात आपले अमुल्य योगदान देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्यावर आधारित चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

सिद्धार्थ आणि कियाराची जमणार जोडी, 'या' चित्रपटासाठी येणार एकत्र

By

Published : May 2, 2019, 4:03 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघेही लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. कारगील युद्धात आपले अमुल्य योगदान देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्यावर आधारित चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'शेरशाह', असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबद्दलची अधिकृत माहिती आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे. 'शेरशाह' चित्रपटाच्या शूटिंगलाही लवकरच सुरुवात होणार आहे. विष्णु वारधान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, करण जोहर, हिरू जोहर, अपुर्वा मेहता, शब्बीर बॉक्सवाला, अजय शाह आणि हिमांशू गांधी हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

सिद्धार्थ बऱ्याच काळानंतर पडद्यावर झळकणार आहे. तर, कियारा ही अलिकडेच 'कलंक' चित्रपटात वरूण धवनसोबत छोट्या भूमिकेत झळकली होती. तिचे वरूणसोबतचे 'बाकी सब फर्स्ट क्लास है', हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच हिट झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details