अमरावती - 'नाळ' चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात आईकडे खेळायला जाण्यासाठी हटट् करणारा 'चैत्या' आता मात्र, हुशार झाला आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २२ मार्चला रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले आहे. या 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद देण्याचे आवाहन श्रीनिवासने एका व्हिडिओद्वारे केले आहे.
'मी आता आई मला खेळायला जायचं जाऊ दे नं वं, असं म्हणणार नाही. कारण, देशात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे रविवारी सर्वांनी घरी राहावे, असे आवाहन बाल कलाकार श्रीनिवास पोकळे याने त्याच्या खास शैलीत केले आहे.