महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूड गाजविल्यानंतर श्रेयस तळपदे दिसणार ‘माझी तुझी रेशीमगाठ' मधून! - Shreyas Talpade returns to TV

श्रेयस तळपदे ‘माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून तो टेलिव्हिजनविश्वात पुनरागमन करतोय. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

By

Published : Jul 29, 2021, 4:00 PM IST

छोट्या पडद्यावर यश मिळविल्यानंतर अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर आपलं नशीब आजमावत असतात आणि त्यात अनेकजण यशस्वीही होतं असतात. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे. मराठी मालिकांतून सुरुवात करून त्याने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट केले. आता त्याला पुन्हा छोट्या पडद्याची आठवण झाली असून एका नव्याकोऱ्या मालिकेतून तो टेलिव्हिजनविश्वात पुनरागमन करतोय. या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया आणि अवंतिका तसेच दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय. तो आता झी मराठीवरील आगामी मालिका "माझी तुझी रेशीमगाठ" या मालिकेतून पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय.

या मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याबाबत बोलताना श्रेयस म्हणाला, "'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका खूप वेगळी आहे. ही एक अनोखी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटेल आणि ते आमच्या मालिकेला भरपूर पाठिंबा देतील ही अपेक्षा आहे. पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होतो आहे.”

हेही वाचा - आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details