महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दत्तगुरुंचा महिमा सांगणारी 'श्री गुरुदेव दत्त' मालिका लवकरच होणार सुरू - star prawah

दत्तगुरुंचा जन्म कसा झाला? बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनसूयासोबतचं त्यांचं नातं मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दत्तगुरुंचा महिमा सांगणारी 'श्री गुरुदेव दत्त' मालिका लवकरच होणार सुरू

By

Published : Jun 6, 2019, 9:10 AM IST

मुंबई - मराठी असो किंवा हिंदी सध्या प्रत्येक वाहिनीवर पौराणिक मालिकांचा ट्रेण्ड पाहायला मिळतोय. 'विठुमाऊली' मालिकेला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादानंतर 'स्टार प्रवाह' वाहिनी आणखी एक पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दत्तगुरुंचा महिमा सांगणाऱ्या या मालिकेचं नाव 'श्री गुरुदेव दत्त' असं आहे.

दत्तगुरुंचा जन्म कसा झाला? बालपणीच्या त्यांच्या अगाध लीला आणि माता अनसूयासोबतचं त्यांचं नातं मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. दत्तगुरुंच्या अवताराची ही गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद अनुभव नक्कीच असेल. या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, 'इतक्या महान अवताराची कथा सांगताना गर्व, अभिमान आणि आनंद वाटतोय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा मिळून एक अवतार जन्मला ते म्हणजे दत्तगुरू. अध्यात्म, सत्य आणि अप्रतिम व्हिज्युअल इफेक्टस याची उत्तम सांगड या मालिकेत दिसेल.

सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक दिपक देऊळकर यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. तर, दिग्दर्शक अनिल राऊत आणि स्वत: दिपक देऊळकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्याकडे आहे. पौराणिक काळ जिवंत करणारा भव्यदिव्य सेट या मालिकेचं आणखी एक वैशिष्टय म्हणता येईल. १७ जूनपासून सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहाता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details