कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. हजारोंच्या फॅन्समधून आपण त्या कलाकाराचे सगळ्यात मोठे फॅन आहोत हे दाखवण्यासाठी ते खूप अजब गोष्टी करत असतात. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वामधील स्पर्धक शिवानी सुर्वे हिचा एक जबरा फॅन आहे. या फॅनने ‘शिवानी स्टाईल’ नावाचा स्टिकर त्याच्या गाडीवर लावला आहे.
निनाद म्हात्रे असं याजबरा चाहत्याचं नाव असून, हा रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये राहणारा आहे. शिवानी सुर्वेच्या या चाहत्याने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ट्रेंड होत असलेल्या ‘शिवानी स्टाईल’ या हॅशटॅगचा स्टिकर बनवलाय. ह्यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणतो, “शिवानी मला खूप आवडते. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचा बेध़डक स्वभाव खूप आवडतो. ती बिग बॉसमध्ये खूप छान खेळत आहे. माझ्यासाठी ती बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची विजेती आहे. मी तिच्याप्रेमाखातर शिवानी स्टाइल स्टिकर गाडीवर लावला आहे. आता लवकरच तिच्या फोटोचा वॉलपेपर माझ्या खोलीत लावणार आहे.”