मुंबई- स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारणार आहे. शिवानीला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. त्यामुळे, ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड उत्सुकही आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार रमाबाई आंबेडकरांची भूमिका
अभिनेत्री शिवानी रांगोळे बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारणार आहे. रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. अशा या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे, असं शिवानीला वाटतं.
रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी कुटुंबही सांभाळलं. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेनं आणि प्रेमानं पाळलं. अशा या थोर व्यक्तीची भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे, असं शिवानीला वाटतं.
या भूमिकेविषयी सांगताना शिवानी म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातली ही खूप वेगळी भूमिका आहे. अतिशय समजूतदार आणि साधारण पेहराव असणारं हे पात्र आहे. या भूमिकेसाठीचा पेहराव, भाषा या गोष्टीसुद्धा माझ्यासाठी नवं आव्हान आहे. धनंजय कीर आणि बाबुराव बागुल या लेखकांच्या पुस्तकांचं वाचन मी करत आहे. रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी मला याचा फार उपयोग होतोय. रमाबाईंचं कार्य अपार आहे. त्यांचं कार्य या मालिकेतून पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल.