मुंबई - बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी हे रोमॅन्टिक चित्रपटांचे बादशाह मानले जातात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकरांना त्यांच्या चित्रपटातून ओळख मिळाली आहे. आता त्यांच्या चित्रपटात एक नवा चेहरा झळकणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटातून एक नवा चेहरा बॉलिवूडला मिळणार आहे.
संजय लिला भन्साळीच्या आगामी चित्रपटात झळकणार 'हा' नवा चेहरा - जावेद जाफरी
बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी हे रोमॅन्टिक चित्रपटांचे बादशाह मानले जातात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकरांना त्यांच्या चित्रपटातून ओळख मिळाली आहे. आता त्यांच्या चित्रपटात एक नवा चेहरा झळकणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटातून एक नवा चेहरा बॉलिवूडला मिळणार आहे.
संजय लिला भन्साळींच्या आगामी चित्रपटात त्यांची बहिण बेला सेगल यांची मुलगी शर्मिन सेगल ही झळकणार आहे. तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी भन्साळी यांनी स्वत: तिला प्रशिक्षण दिले आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ती जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरी याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट २०१९च्या शेवटी प्रदर्शित होईल, असे बोलले जात आहे.
शर्मिनच्या या ग्रॅन्ड लॉन्चिंगबाबत ती म्हणते, की 'जेव्हा मी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करण्याचे ठरविले, तेव्हा मी आपल्या अभिनयातून भावना कशा दाखवता येतील यावर जास्त तयारी केली. अनुभवातून मला आणखी शिकता येईल', असेही ती एका माध्यमाशी बोलताना म्हणाली.