मुंबई -सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'दबंग ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलिकडेच या चित्रपटाचं मध्यप्रदेश येथील शूटिंग पूर्ण झाले आहे. आता पुढच्या शूटिंगसाठी चित्रपटाची टीम राजस्थान येथे रवाना झाली आहे. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे शूटिंग थोडावेळ थांबवावे लागले. तरीही सलमान खानने मात्र, या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. त्याने या पावसाचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
सलमान खानसोबत सोनाक्षी सिन्हा देखील यावेळी उपस्थित होती. सलमानने हा व्हिडिओ शेअर करुन खास कॅप्शनही दिलं आहे.
मध्यप्रदेश येथे चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सलमानने बरेचसे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यानंतर त्याने मुंबईला परत येऊन 'भारत' चित्रपटाचे प्रमोशन केले. त्याच्या 'भारत' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता तो 'दबंग ३' मधुन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'चुलबुल पांडे'च्या रुपात सलमान खान पुन्हा एकदा 'दबंग ३'मध्ये भूमिका साकारत आहे. तर, सोनाक्षी 'रज्जो'च्या भूमिकेत पाहायला मिळेल.
'दबंग' नंतर सलमान खानची आलिया भट्टसोबत संजय लिला भन्साळीच्या चित्रपटातही वर्णी लागली आहे. 'ईन्शाल्ला' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.