मुंबई- बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सलमान खानचा भाचा अब्दुल्ला खान याचे मुंबईतील एका रुग्णालयात सोमवारी रात्री निधन झाले आहे. सलमान खानने त्याला श्रद्धांजली देऊन एक भावनिक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
सलमान खानने अब्दुल्ला सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे आहे. आम्ही तुमच्यावर नेहमी प्रेम करू, असे कॅप्शन देऊन त्याने अब्दुल्लाला श्रद्धांजली वाहिली आहे.