महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमान खान-असिनच्या 'रेडी' चित्रपटाला ८ वर्षे पूर्ण, दिग्दर्शकाने शेअर केला व्हिडिओ - anees bazmi

'रेडी' चित्रपटाच्या गाण्यांपासून ते सलमान खानच्या डान्स स्टेप्सपासून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला होता. सलमान आणि असिनची जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

सलमान खान-असिनच्या 'रेडी' चित्रपटाला ८ वर्षे पूर्ण

By

Published : Jun 4, 2019, 10:34 AM IST

मुंबई -सलमान खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री असिन यांचा सुपरहिट ठरलेल्या 'रेडी' चित्रपटाला आज ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. सलमान खानने त्याच्या करिअरमध्ये बऱ्याच चित्रपटात 'प्रेम' नावाने भूमिका साकारल्या आहेत. 'रेडी' या चित्रपटातही त्याचे नाव 'प्रेम' असेच होते. कॉमेडी आणि अॅक्शनने ओतपोत भरलेल्या 'रेडी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिस बज्मी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सलमान खान-असिनच्या 'रेडी' चित्रपटाला ८ वर्षे पूर्ण, दिग्दर्शकाने शेअर केला व्हिडिओ

'रेडी' चित्रपटाच्या गाण्यांपासून ते सलमान खानच्या डान्स स्टेप्सपासून प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला होता. सलमान आणि असिनची जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटातील 'ढिंकाआज चिका ढिंका चिका', 'कॅरक्टर ढिला है' ही गाणी देखील हिट ठरली.

सध्या असिन ही चित्रपटांपासून लांब आहे. तर, सलमान खान लवकरच 'भारत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details