मुंबई- 'रॉमकॉम' या चित्रपटातून एक नवी जोडी झळकणार आहे. विजय गिते आणि मधुरा वैद्य या चित्रपटात राहुल आणि सुमन या प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला.
"रॉमकॉम" चित्रपटातून झळकणार नवी जोडी, टीझर प्रदर्शित - romcom marathi cinema teaser
रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी मांडण्यात आली आहे. हळुवार, हलकीफुलकी, नात्याचे विविध पदर उलगडणारी अशी ही प्रेमकहाणी आहे.
ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट फिल्म आणि कास्टिंग एजन्सी यांनी "रॉमकॉम" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन शिंदे चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सुशील शर्मा सहनिर्माते आहेत. गोरख जोगदंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी मांडण्यात आली आहे. हळुवार, हलकीफुलकी, नात्याचे विविध पदर उलगडणारी अशी ही प्रेमकहाणी आहे.
विजयनं या पूर्वी स्ट्रगलर्स, इपितर, दोस्तीगिरी अशा चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. तर मधुरानं तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केलं होतं. त्यामुळे रॉमकॉम हा मधुराचा पदार्पणाचा चित्रपट ठरणार आहे. या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक फ्रेश जोडी मिळणार आहे. या कलाकारांसोबतच किशोर कदम,छाया कदम,अंतरा पाटील,श्वेता नाईक,स्वाती पानसरे,फकिरा वाघ,दिलीप वाघ,शोभा दांडगे,सिद्धेश्वरा आणि आसित रेड्डी या कलाकारांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळणार असून येत्या १८ ऑक्टोबरला हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.