मुंबई- सशस्त्र दलांवर आधारित प्रसिद्ध मालिकांमधील ओरिजिनल मालिकांचे सादरीकरण डिस्कव्हरी+ वर होणार असून यातून रोहित शेट्टी आणि फरहान अख़्तर यांच्या ‘मिशन फ्रंटलाईन’ मधील खडतर प्रशिक्षणाची झलक दिसणार आहे. डिस्कव्हरी+ मध्ये ‘होम ऑफ पॅट्रिएट्स’ सर्वोत्तम देशभक्तीचे कंटेंट बघायला मिळेल. त्यामध्ये मिशन फ्रंटलाईन, लडाख वॉरीयर्स, ब्रेकिंग पॉईंट, स्पेशल ऑपरेशन्स इंडीया व इतर अनेक शीर्षकांचा समावेश असेल.
राणा दग्गुबती आणि सारा अली खान ह्यांच्या मिशन फ्रंटलानमधील समावेशाला मिळालेल्या उल्लेखनीय प्रतिसादानंतर या साहसाने भरलेल्या भागांमध्ये फरहान अख़्तर आणि रोहीत शेट्टी असतील व ते साहस, सहनशक्ती, कठोर प्रशिक्षण, अतिशय कष्टाने मिळवलेली पात्रता आणि पॉवरफुल व्हिज्युअल्ससह प्रत्येक भाग भारताच्या योद्ध्यांच्या जीवनाची एक झलक प्रेक्षकांसमोर आणतील.
या अभियानाअंतर्गत मिशन फ्रंटलाईन मध्ये फरहान अख़्तर जम्मू- कश्मीरच्या राष्ट्रीय रायफल सैनिकांसोबत खडतर प्रशिक्षण धेईल तर रोहीत शेट्टी श्रीनगरच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रूपचे पोलिस अधिकारी यांच्यासह साहसी कृत्ये करताना दिसतील. अभिनेता, लेखक, निर्माता व सादरकर्ता फरहान अख़्तर व प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता रोहीत शेट्टी हे या ‘मिशन फ्रंटलाईन’चा भाग असतील.
फरहान अख़्तर म्हणाला, “माझ्या भावना एका शब्दामध्ये व्यक्त करणे मला अशक्य आहे. आम्ही जेव्हा लक्ष्यचे शूटींग करत होतो, तेव्हा आम्ही आपल्या जवानांचं व्यक्तिगत जीवन अगदी जवळून बघू शकलो होतो. परंतु त्यांच्या जागी जाऊन राहणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या समोर असलेल्या कठीण परिस्थितीला सामोरे जाणे, हा जीवन बदलणारा अनुभव होता. अशा प्रतिकूल प्रदेशामध्ये व विपरित स्थितीमध्ये प्रशिक्षण प्राप्त करणे, हे माझ्यासाठी अतिशय कठीण होते, परंतु त्यांचे सहाय्य आणि प्रोत्साहन यामुळे ते शक्य बनले.”