महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पॉर्न फिल्म प्रकरण : अभिनेत्री गहना वशिष्ठला न्यायालयाचा दिलासा - Porn movie episode

पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठाला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात नोंदवलेल्या तिसऱ्या एफआयआरमध्ये गहनाच्या अटकेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्यास तिला न्यायालयाने सांगितले. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने गेहनाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

गहना वशिष्ठाला न्यायालयाचा दिलासा
गहना वशिष्ठाला न्यायालयाचा दिलासा

By

Published : Sep 22, 2021, 4:00 PM IST

Updated : Sep 22, 2021, 4:37 PM IST

मुंबई - पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठाला दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अटक होण्याची टांगती तलवार तिच्यावर होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात नोंदवलेल्या तिसऱ्या एफआयआरमध्ये गहनाच्या अटकेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्यास तिला न्यायालयाने सांगितले. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने गेहनाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

काय आहे प्रकरण?

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात एका मॉडेलने आरोप केले होते. या आरोपात जबरदस्तीने अश्लील सिनेमांमध्ये काम करायला लावणे, धमकवणे असे आरोप लावण्यात आले होते. यानंतर गहना वशिष्ठला अटक करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने गहनाला जामीन दिला होता. आता या प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव समोर आले आहे. राज कुंद्राच्या हॉटशॉट्स आणि बॉलिफेम या अॅपसाठी गहना अश्लील व्हिडिओ बनवत होती.

क्राइम ब्रांचकडून करण्यात आली अटक

अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबईच्या मढ आयलँडमध्ये क्राइम ब्रँचने बंगल्यावर छापा टाकून अटक केली होती. तिच्यावर अश्लील रॅकेटमध्ये गुंतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गहना सुरुवातीपासूनच राज कुंद्राला पाठिंबा देत आली आहे. क्राइम ब्रँचने पुन्हा समन्स बजावल्यानंतर गहनाने सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून वारंवार होत असलेल्या चौकशीच्या फेऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

तपासादरम्यान गहनाचे नाव

उद्योगपती राज कुंद्राच्या कंपनीच्या तीन-चार निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अभिनेत्री गहना वशिष्ट हिचेदेखील नाव आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपासादरम्यान, आता आरोपींमध्ये गहनाचे नाव समोर आले आहे.

गहनाकडून कुंद्राची पाठराखण

राज कुंद्रा अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अडकल्यापासून गहना नेहमी त्याची पाठराखण करीत असते. कुंद्रा हा पॉर्न फिल्म बनवीत नव्हता, तर इरॉटिक सिनेमा बनावायचा असा युक्तीवाद केला जात आहे. गहनादेखील हेच सांगत आहे.

हेही वाचा - खतरों के खिलाडी 11: अर्जुन बिजलानी ठरला विजेता, आता ग्रँड फिनालेच्या टेलिकास्टची प्रतीक्षा

Last Updated : Sep 22, 2021, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details