मुंबई - टीव्ही जगताची 'क्विन' मानली जाणारी दिग्दर्शिका एकता कपूर हिचा आज वाढदिवस आहे. आज ती तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. छोट्या पडद्यावरील तिच्या 'सांस-बहुं' कार्यक्रमांना प्रेक्षकांची पसंती मिळते. टीआरपीच्या शर्यतीतही तिच्या मालिका अव्वल असतात. आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे. मात्र, वैयक्तिक आयुष्यात आजपर्यंत तिने लग्न केले नाही. यामागचे कारण तिने तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची एक अट असल्याचे सांगितले आहे.
B'Day Spl: जितेंद्र यांच्या 'या' अटीमुळे एकता कपूर आजपर्यंत राहिली अविवाहित - tushar kapoor
एकता कपूरने लग्न केले नाही. मात्र, ती काही महिन्यांपूर्वीच सरोगसीद्वारे एका मुलाची आई बनली आहे.
एकता कपूरने लग्न केले नाही. मात्र, ती काही महिन्यांपूर्वीच सरोगसीद्वारे एका मुलाची आई बनली आहे. लग्न न करण्याबाबत तिने सांगितले, की माझ्यासाठी माझे करिअर फार महत्वाचे आहे. माझ्या वडिलांनीही मला सांगितले होते, की तुला करिअर आणि लग्न या दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा लागेल. एकतर लग्न कर किंवा फक्त करिअरच कर, असे ते जेव्हा म्हणाले तेव्हा मी माझे करिअर निवडण्याचा निर्णय घेतला'.
'मी माझ्या बऱ्याच मित्र मैत्रीणींचे लग्न पाहिले. मात्र, काही काळानंतर ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यामुळे मला लग्न करण्याची इच्छा नाही', असेही एकता कपूरने सांगितले होते.
एकता कपूर आज आघाडीची निर्माती आहे. तिने तिच्या दत्तक मुलाचे नाव तिच्याच वडिलांच्या नावावरुन 'रवि' असे ठेवले आहे. एकताचा भाऊ अभिनेता तुषार कपूर यानेही अद्याप लग्न केले नाही. तो देखील सरोगसीच्या माध्यमातून सिंगल फादर बनला आहे. दोघेही आपल्या आयुष्यात आनंदी आहेत.