अकोला- 'तुझ्यात जीव रंगला' या मराठी दूरचित्रवाहिनीवरील नाटकातून प्रसिद्धीस आलेला भाल्या म्हणजेच अतुल पाटील हा कलाकार आता पोलीस झाला आहे. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून तो उत्तीर्ण झाला आहे. कुस्तीपटू, अभिनेता आणि आता प्रत्यक्ष पोलीसाच्या भूमिकेत भाल्या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कर्तव्य बजावताना दिसणार आहे.
'तुझ्यात जीव रंगला'तील भाल्याचा खऱ्या आयुष्यात पोलीस बनण्यापर्यंतचा रंजक प्रवास - police
पोलीस प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षणाचा होणारा त्रास सहन न झाल्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट भाल्याने केला आहे. परंतु, येथील प्रशिक्षकांच्या सहकार्यामुळे असे केले नसल्याचे त्याने सांगितले.
पोलीस प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षणाचा होणारा त्रास सहन न झाल्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट भाल्याने केला आहे. परंतु, येथील प्रशिक्षकांच्या सहकार्यामुळे असे केले नसल्याचे त्याने सांगितले. 'तुझ्यात जीव रंगला' या मराठी मालिकेतील राणादाचा जिवलग मित्र भाल्या म्हणजेच अतुल पाटील हा अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पोलीस बनण्यासाठी २० ऑगस्ट २०१८ ला दाखल झाला होता.
याबद्दल बोलताना अतुल पाटील म्हणाला, वडील पोलीस असतानाही मी कुस्ती खेळावी तसेच पोलीस विभागातही रुजू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पोलीस प्रशिक्षण घेत असताना अभिनयाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, आता तसे होणार नाही जसे कुस्ती अतुल पाटील हे समीकरण आहे. तसेच 'तुझ्यात जीव रंगला' या मराठी मालिकेतील राणादा आणि भाल्या हे आहे. त्यामुळे लवकरच या मालिकेत मी परतणार आहे, असा आशावाद व्यक्त करीत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.