आफ्रिकेच्या घनदाट जंगलाचे आकर्षण अनेकांना असते. परंतु तेथे भेट देण्यास सर्वांना जमतेच असे नाही त्यामुळे सोनी बीबीसी अर्थने ‘सेरेंगेटी’ नावाची सिरीज आणली होती. आता ते सेरेंगेटी चा दुसरा भाग घेऊन येत आहेत जी आफ्रिकेच्या मध्यवर्ती भागातील सर्वात मोठी रिअल-लाइफ ड्रामा सिरीज असेल. नवीन पात्रं, नवीन कथा, नवीन वळण, नवीन संकट, नवीन संघर्ष, पण त्याच अद्भुत सेटिंगसह सोनी बीबीसी अर्थ 'सेरेंगेटी २’ च्या माध्यमातून वन्यजीवांची आणखी एक रोमांचकारी कथा घेऊन येत आहे. वन्यजीवाच्या नाट्यमय कथांना विनोदी ट्विस्ट देत आपल्या विचारसरणीपेक्षाही अधिक प्राणी आपल्यासारखे आहेत या तथ्याला प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे.
‘सेरेंगेटी २’ हा शो आफ्रिकेच्या अस्पृश्य प्रदेशांतील प्राण्यांच्या नाट्यमय आणि भावनिकपणे एकमेकांशी जोडलेल्या कथा दाखवतो. विनोद, हृदयभंग आणि तणावाने भरलेली, नवीन पात्रं अद्वितीय प्राणी वर्तनाच्या शोधात निघाली आहेत. मानवी जीवनाशी त्यांचे कसे आणि काय साम्य आहे हे ते शोधून काढणार आहेत. सेरेंगेटी २ ही मालिका बकरी जातीतील बबून म्हणजेच मोठा वानर, काली सिंहीण, बिबट्यांच्या त्यांच्या प्रेमळ पिल्लांसोबतचा कळप आणि अनेक नवीन प्राणी-पात्र अशा आफ्रिकन वन्यजीवाच्या हृदयस्पर्शी कथांना दाखवतो.
अत्याधुनिक स्थिर कॅमेरा यंत्रणा, कलाटणी देणा-या तंत्रज्ञानाचा समावेश असलेले आधुनिक ड्रोन्स यांचा वापर करत 'सेरेंगेटी २’ प्राण्यांच्या व्यापक व सहानुभूतीपूर्ण वर्तनाला सादर करतो. अकॅडमी पुरस्कार-प्राप्त अभिनेत्री (स्टार वॉरर्स व ब्लॅक पॅन्थर प्रसिद्धीप्राप्त) लुपिता एनयाँग यांची पटकथा आणि जॉन डाऊनर व सायमन फुलर निर्मिती शो वन्यजीवनामधील निसर्गाच्या सर्वात लक्षवेधक पात्रांच्या जीवनांना अधोरेखित करणारे जटिल नाते, थरारक संघर्ष व कोमल क्षणांचा आनंद देतो.