मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या 5 दशलक्ष ओलांडली आहे. यावेळी, अभिनेत्री रवीनाने सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात ती बर्फात उडी मारताना दिसत आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देताना रवीनाने लिहिलंय, "याला आनंदाने वेडे होणे म्हणतात. ५ दशलक्ष फॉलोअर्स. सर्वांना खूप प्रेम.''
दुसर्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "आणि इंस्टाग्रामवर कुटुंब हळू हळू वाढत आहे."