मुंबई- काही दिवसांपूर्वी 'बचपन का प्यार' या गाण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. छत्तीगडमधील शाळेतील मुलगा सहदेव दिरदो याने हे गीत गायले होते. त्याच्या शिक्षकाने काही वर्षापूर्वी तो तिसरीत असताना हे गीत गायले. मात्र हे गाणे अलिकडे व्हायरल झाले आणि यावर हजारो लोकांनी व्हिडिओ बनवले आणि करोडो लोकांनी हे गाणे पाहिले. अशा तऱ्हेने एका रात्रीत सहदेव दिरदो हा मुलगा प्रसिध्दीस आला.
सहदेव हा मूळचा सुकमा, छत्तीसगडचा रहिवासी आहे. आता तो 10 वर्षांचा आहे. आता बुधवारी रिलीज झालेल्या झालेल्या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन 'बीटूगेदर प्रोस' 'BeTogether Pros' यांनी केले आहे. रॅपर बादशाह, गायिका आस्था गिल आणि संगीतकार रिको यांनी यात काम केले आहे.