मुंबई - बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देणारा रणवीर सिंग सध्या 'गली बॉय' चित्रपटामुळे चांगलाच लोकप्रिय झाला आहे. रणवीरचे या वर्षात 'सिम्बा' आणि 'गली बॉय' हे दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपरहिट ठरलेत. लवकरच 'गली बॉय'चा सिक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर नेहमीच त्याच्या अतरंगी स्वभावामुळे चर्चेत असतो. त्याचा हा अंदाज प्रेक्षकांनाही भावतो. अलिकडेच रणवीरने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्याने 'नंगा पुंगा' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये तो अतिशय फिट दिसत आहे. त्याच्या या फोटोला २ तासातच ७ लाखापेक्षा जास्त चाहत्यांनी लाईक केले आहे. चाहत्यांनी या फोटोवर मजेशीर प्रतीक्रियादेखील दिल्या आहेत.