महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Rakhi Sawant : राखी सावंत पती रितेशसोबत निघाली आऊटिंगला

राखी सावंत ‘बिग बॉस’च्या घरातून पती रितेशसोबत आऊटिंगला निघाली होती. यादरम्यान सर्व पापाराझींनी त्यांना घेरले आणि दोघांनाही एकत्र पाहून शुभेच्छा देऊ लागले. मीडियाला पाहताच राखी सावंत पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये आली

Rakhi Sawant
Rakhi Sawant

By

Published : Jan 29, 2022, 3:16 PM IST

मुंबई - बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध ‘आयटम गर्ल’ राखी सावंतचा ‘बिग बॉस १५’ चा प्रवास नुकताच संपला आहे. मात्र, घरातून बाहेर पडताच ड्रामा क्वीनला तिचा नवरा रितेश भेटला आहे. त्याचवेळी, अभिनेत्री रस्त्यावरच तिच्या पतीकडे किसची मागणी करताना दिसली आहे.

मीडियासमोर मागितली किस
राखी सावंत ‘बिग बॉस’च्या घरातून पती रितेशसोबत आऊटिंगला निघाली होती. यादरम्यान सर्व पापाराझींनी त्यांना घेरले आणि दोघांनाही एकत्र पाहून शुभेच्छा देऊ लागले. मीडियाला पाहताच राखी सावंत पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये आली आणि तिने रितेशकडे किसची मागणी करायला सुरुवात केली. किस मागताना राखी म्हणाली, “अरे दे तरी… व्हिडिओ पाहून एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “दीपक कलाल हा व्हिडिओ पाहून कोपऱ्यात रडला असेल.” दुसर्‍याने लिहिले, “बस कर यार, आता खूप अॅक्टींग झाली.” त्याचवेळी दुसरा म्हणतो की, “दोघेही प्रसिद्धीसाठी काहीही करत आहेत.”

व्हिडिओ झाला व्हायरल
मात्र, राखीचे हे वागणे पाहून पती रितेश लाजून लालबुंद झालेला दिसला. पण राखीने हार न मानता रितेशची किस घेतली. या जोडप्याचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यासोबतच चाहते एकापेक्षा एक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. क्लिपमध्ये, अभिनेत्रीने केशरी रंगाचा ट्रॅकसूट परिधान केलेला दिसत आहे, तर रितेश पांढर्‍या आणि काळ्या पोशाखात दिसत आहे.

हेही वाचा -अल्लू अर्जुन दुबईहून परतल्यानंतर मुलगी अर्हाने केले गोड स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details