महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियांका-निकच्या संसाराला विघ्नसंतोषी मीडियाचीच दृष्ट

प्रियांका-निक अवघ्या चार महिन्यातच एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.

प्रियांका-निकच्या संसाराला विघ्नसंतोषी मीडियाचीच दृष्ट

By

Published : Mar 30, 2019, 8:12 PM IST

मुंबई -बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात जोधपूर येथे त्यांचा विवाहसमारंभ पार पडला. त्यांच्या लग्नाला आता चार महिने पूर्ण झाले आहेत. या चार महिन्याच्या काळात त्यांचे बरेचसे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, त्यांच्या संसाराला विघ्नसंतोषी मीडियाचीच दृष्ट लागल्याचे सध्या दिसून येत आहे.

प्रियांका-निक अवघ्या चार महिन्यातच एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. अनेक माध्यमांनी त्यांचा संसार मोडणार असल्याचे वृत्त दिले आहे. मात्र प्रियांका आणि निक सध्या मियामी येथे एकमेकांसोबत वेळ घालवण्यात गुंतले असताना, त्यांच्या घटस्पोटाच्या चर्चा मध्येच कुठून सुरू झाल्या, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

एका तथाकथीत माध्यमाने प्रियांका-निकच्या घटस्पोटाचे वृत्त दिल्याचे अनेक माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, प्रियांकाच्या टीमने याबाबत स्पष्ट केले आहे, की ते दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहेत. त्यांचा घटस्पोट घेण्याचा कोणताही विचार नाही. असे असतानाही अनेक माध्यमांनी त्या वेबसाईटच्या नावावर त्यांच्या घटस्पोटाचं वृत्त दिलं आहे.

आजकाल कलाकारांच्या ब्रेकअप आणि पॅचअॅपच्या चर्चांना तर कलाविश्वात उधाण आलेले असते. मात्र, कोणाचा संसार सुरळीत सुरू असताना त्याला अशाप्रकारचे गालबोट लावणे कितपत योग्य आहे, हे सुजाण वाचकांनी लक्षात घ्यायला हवे, अशा सवंग आणि भ्रम निर्माण करणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

ABOUT THE AUTHOR

...view details