महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांना करोनाची लागण - priya bapat

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द कलाकार जोडपे प्रिया बापट आणि उमेश कामत यांना करोनाची लागण झाली आहे. दादा एक गूड न्यूज आहे या नाटकाचे मार्च महिन्याचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

umesh and priya
उमेश आणि प्रिया

By

Published : Mar 18, 2021, 12:57 PM IST

मुंबई- मराठी चित्रपटपटसृष्टीतील प्रसिध्द कलाकार जोडपे प्रिया बापट आणि उमेश कामत यांना करोनाची लागण झाली आहे. १७ मार्चला प्रियाने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून चाहत्यांना ही बातमी दिली आहे. यामुळे उमेशची मुख्य भूमिका असलेले दादा एक गूड न्यूज आहे या नाटकाचे मार्च महिन्याचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह

माझी आणि उमेशची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही घरीच गृह अलगीकरणात आहोत. डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे घेत आहोत. तसेच त्यांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहोत. या आठवड्याच्या कालावधीत आमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी करोना चाचणी करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचे ‘हाकमारी’ करत निर्मितीक्षेत्रात पदार्पण!

दादा एक गूड न्यूज आहे

'दादा एक गूड न्यूज आहे' नाटकाचे मार्च महिन्यातील प्रयोग रद्द

२० डोंबिवली, २१ ला दीनानाथ, २७ पुणे , २८ वाशी आणि २९ मार्चला ठाण्याला गडकरी रंगायतनला नाटकाचे प्रयोग होणार होते. मात्र, उमेशला करोनाची बाधा झाल्याने आम्ही या महिन्याचे सर्व प्रयोग रद्द केले आहेत. एप्रिल महिन्यापासून आम्ही पुन्हा नाटकाचे प्रयोग सुरू करणार आहे, नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.

हेही वाचा -आलिया भट्टचा ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘सीता’ लूक आला समोर

ABOUT THE AUTHOR

...view details