मुंबई - ‘जुळून येति रेशीमगाठी’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या पॉझिटिव्ह विचारांसाठी आणि सुहास्य वदनासाठी प्रसिद्ध आहे. मालिका, चित्रपटातून काम करीत असतानाच ती तिची विनोदाची आवड सध्या प्रेक्षकांची पहिली पसंती असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून भागवत आहे. प्राजक्ता स्वतःला ‘फूडी’ म्हणवून घेते. तिला वेगवेगळ्या प्रकारची व्यंजनं चाखायला आवडतात. खरंतर तिला स्वयंपाक येत नसला तरी तिला सवयंपाकघरातील जिन्नसांचे महत्व माहित आहे. पक्की पर्यावरणवादी असलेल्या प्राजक्ताला नैसर्गिक आहारदेखील तेवढाच आवडतो. यात तिचे सर्वात आवडते खाणे किंवा फळ म्हणजे आंबा. 'मस्त महाराष्ट्र' या टीव्हीवरील पर्यटन शोच्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी कोकणात पोहोचलेली प्राजक्ता रत्नागिरी मुक्कामी आपले हापूस आंबा प्रेम लपवू शकली नव्हती.
लॉकडाऊनच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लोकांना आपल्या शेतातला ताजा, स्वच्छ व आहारासाठी पोषक भाजीपाला व फळे ऑनलाईन पद्धतीने घराच्या दारापर्यंत पोहोचविणाऱ्या 'किसानकनेक्ट' या शेतकरी मंचाने आयोजित केलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या, आगळ्या ऑनलाईन आंबा महोत्सवातून प्राजक्ता माळीने आंबा खरेदी करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले. तसेच इतरांनीही खरेदी करून या शेतकरी मंचाला पाठिंबा द्यावा असे आवाहनही केले. कोरोनाच्या लॉकडाऊन काळामध्ये बंद घरांतील लाखो लोकांना तिने शेतकऱ्यांच्या शेतातून थेट घरपोच होणारा भाजीपाला व फळे पोहोचविण्यास मदत केली.
महाराष्ट्राची '’स्माईल क्वीन’ प्राजक्ता माळी हिचे मधुर हास्य जसे प्रसिद्ध आहे, तितकेच तिचे हापूस आंब्यांवर असलेले प्रेमसुद्धा. रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांचा मोसम सुरू होत असतानाच थेट बागेतून आलेल्या आवडत्या ताज्या हापूसची चव कधी एकदा चाखतो असे झालेल्या प्राजक्ताने आपल्या घरी चक्क आंबा महोत्सवच साजरा केला. आपल्या तब्येतीच्या व आहाराच्या बाबतीत अतिशय काटेकोर असणाऱ्या प्राजक्ताने आंबे खरेदी करतानाही चोखंदळपणा दाखविला. याआधी रत्नागिरीचा या मोसमाचा हापूस आंबा कधी तयार होईल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो थेट घरपोच व सुरक्षित रितीने मिळेल का, अशा गोष्टींची खातरजमा तिने केली होती.
‘ईट राईट'चा नारा दिलेल्या किसानकनेक्टच्या शेतकऱ्यांकडून घेतलेल्या हापूस तसेच केसर, लालबाग, लंगडा अशा रसाळ जातींच्या आंब्यांची चव घेताना त्यांच्यातल्या पोषणमूल्यांची माहितीही तिने करून घेतली. या ऑनलाईन आंबा महोत्सवात आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी़ही प्राजक्ताला आ़ंबा कसा निवडावा, त्याची परीक्षा कशी करावी, त्यातली पोषकद्रव्ये कोणती, आहारात आंब्याचे महत्त्व अशा अनेक विषयांवर विशेष संवाद साधत माहिती दिली. आंब्यांबरोबरच ताजा, पेटीबंद भाजीपालाही प्राजक्ताने खरेदी केला आणि या आव्हानात्मक काळात लोकांना स्वच्छ व सुरक्षितपणे हाताळलेली भाजी व फळे घरपोच घेण्याचे आवाहन केले.
प्राजक्ता माळीने सामाजिक बांधिलकी व पर्यावरण प्रेम जपत हापूस व इतर आंब्यांची लज्जत घेत घरातच ‘आंबा महोत्सव’ साजरा केला.
प्राजक्ता माळीचा ‘आंबा महोत्सव’ साजरा करीत शेतकरी मंचाला पाठिंबा! - Prajakta Mali, the "Smile Queen" of Maharashtra
लोकांना आपल्या शेतातला ताजा, स्वच्छ व आहारासाठी पोषक भाजीपाला व फळे ऑनलाईन पद्धतीने घराच्या दारापर्यंत पोहोचविणाऱ्या 'किसानकनेक्ट' या शेतकरी मंचाने अंबा महोत्सव आयोजित केला होता. यात प्राजक्ता माळीने आंबा खरेदी करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले. तसेच इतरांनीही खरेदी करून या शेतकरी मंचाला पाठिंबा द्यावा असे आवाहनही केले.
प्राजक्ता माळी