मुंबई - अल्ट बालाजी आणि झी 5 या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी 'पौरषपुर' या बहुप्रतिक्षित शोचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या शोमध्ये प्रेमासह, वासना, रक्ताने भिजलेल्या तलवारी, कठोर संवादांचे नेत्रदीपक सेट दिसतील. या कार्यक्रमात अन्नु कपूर, मिलिंद सोमण, शिल्पा शिंदे, शाहीर शेख, साहिल सलाथिया, पोलोमी दास, अनंत विजय जोशी, फ्लोरा सैनी आणि आदित्य लाल यांच्यासह अनेक कलाकार आहेत.
१ ६ व्या शतकातील भारताच्या पार्श्वभूमीवर राजा भाद्रप्रताप सिंग (अन्नू कपूर) यांना ''पौरषपुर'च्या दुनियेत अत्यंत दुष्ट साम्राज्यावर राज्य करताना दाखवण्यात आले आहे. हे एक असे राज्य आहे जेथे महिलांना इच्छेच्या वस्तू म्हणून पाहिले जाते. येथे महिलांच्या स्वातंत्र्यावरही बंदी आहे. अशा राजवटीत राणी मीरावती (शिल्पा शिंदे) पुरुषप्रधान कायद्यांना आव्हान देताना दिसते.
मिलिंद सोमण यांना बोरिसच्या व्यक्तिरेखेत ट्रान्स जेंडर म्हणून दाखवण्यात करण्यात आले आहे. राज्याच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण करून तो क्रांतीला सुरूवात करतो. याशिवाय भानूच्या रूपात साहिल सलाथिया, वीर सिंह म्हणून शाहीर शेख, कला म्हणून पोलोमी दास, प्रिन्स आदित्य म्हणून अनंत विजय जोशी हे दिसणार आहेत. 'पौरषपुर' साम्राज्याच्या साहसी आणि क्रूर कथेचे बरेच वेगवेगळे ट्विस्ट आहेत, जे प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील.