मुंबई - देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रदुर्भाव पाहता शासनाने चित्रपटगृह तसेच नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता १९ ते ३१ मार्चपर्यंत आगामी कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग होणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. प्रोड्युसर्स गिल्डचे सीईओ कुलमीत मक्कर यांनी एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, तसेच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान शासनाच्या निर्णयाला प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाकडून पाठींबा देऊन १९ ते ३१ मार्च दरम्यान शूटिंग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.