महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेत अवतरणार संत बाळूमामाचं मोठेपणीचं रूप - serial

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेमध्ये आता नवा अध्याय सुरु होणार असून यात बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा आणि विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडणार आहे.येत्या २० मेपासून बाळू मामाचा हा मोठा अवतार आपल्याला पाहायला मिळेल.

संत बाळूमामाचं मोठेपणीचं रूप

By

Published : May 16, 2019, 2:13 PM IST

मुंबई- दक्षिण महाराष्ट्रातले एक थोर संत म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका वर्षभरापूर्वी 'कलर्स मराठी' वाहिनीवर दाखल झाली. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललिलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली आणि अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषानं दुमदुमला.

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या मालिकेतील बाल अवतारातील बाळूमामांना रसिकांनी देवत्व देण्याबरोबरच आपल्या घरातल्या लाडक्या व्यक्तीसारखं प्रेम केलं. म्हणूनच छोटे बाळूमामा हे महाराष्ट्रातील घराघरातलं लाडकं व्यक्तिमत्व बनलं. मात्र, आता या मालिकेत बाळूमामांचं बालपण संपून ते मोठ्या रुपात अवतरणार आहेत. आपल्या अस्तित्वाने 'अकोळ' सारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवणारे बाळूमामा मालिकेत आता लवकरच मोठ्या रुपात दिसणार आहेत.

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेमध्ये आता नवा अध्याय सुरु होणार असून यात बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा आणि विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडणार आहे. दिनदुबळ्यांचा कैवार घेणारे, गरीबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे संत बाळूमामा यांची ही चरित्रगाथा एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या महान संताच्या चरित्रगाथेत येत्या २० मेपासून बाळू मामाचा हा मोठा अवतार आपल्याला पाहायला मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details