मुंबई - अभिनेत्री नेहा पेंडसे गेल्या काही दिवसांपासून साखरपुड्याच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नेहानं शार्दुल बयाससोबत साखरपुडा केल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर येत होते. यानंतर अनेकांनी शार्दुलच्या स्थूलपणावर टीका करत त्याची खिल्ली उडवली.
या सर्वांना आता नेहा पेंडसेने सडेतोड उत्तर दिलं आहे. अशा प्रकारच्या टीकांचा सामना काही दिवसांपूर्वी आपल्यालाही करावा लागत असल्याचं सांगत नेहा म्हणाली, प्रेक्षक म्हणून तुम्ही कलाकारांच्या लूकवर प्रतिक्रिया देऊ शकता. मात्र, विनाकारण टीका करणं चुकीचं आहे.
समोरची व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक आजाराचा सामना करत असेल, याचा विचार टीका करण्याआधी करायला हवा. शार्दुलचा अभिनयाशी किंवा मनोरंजन विश्वासोबत काहीही संबंध नाही. तो एक व्यावसायिक आहे. अशात त्याची खिल्ली उडवणं हे संतापजनक असल्याचं नेहानं म्हटलं आहे.
ट्रोलर्सला मला हे विचारावं वाटतं, की तो व्यक्ती मला किती आनंदी ठेवतो, हे तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल काहीही माहिती नसताना हे ठरवणारे तुम्ही कोण, की कोणता मुलगा माझ्यासाठी चांगला आहे आणि कोण वाईट. खूप काळानंतर मला माझ्या आयुष्यात शार्दुलच्या रुपात खरं प्रेम मिळालं आहे, असंही ती पुढे म्हणाली.