महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ख्याल रख्या कर' गाण्याने नेहा कक्कर साजरी करणार प्रेग्नेन्सी - व्हिडिओमध्ये नेहा सोबत पती रोहनप्रीत

गायिका नेहा कक्कर 'ख्याल रख्या कर' या नवीन गाण्याने तिची प्रेग्नेन्सी साजरी करणार आहे. २२ डिसेंबरला हे गाणे प्रदर्शित करणार आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये नेहा सोबत पती रोहनप्रीत आहे.

Neha Kakkar's new song
'ख्याल रख्या कर'

By

Published : Dec 19, 2020, 4:25 PM IST

मुंबईः गायिका नेहा कक्कर हिने शनिवारी आपली प्रेग्नन्सी साजरी करण्यासाठी नवीन गाण्याची घोषणा केली. ती २२ डिसेंबरला हे गाणे प्रदर्शित करणार आहे.

‘ख्याल रख्या कर’ असे शीर्षक असलेल्या या गाण्याची घोषणा नेहाने जगासमोर गरोदरपणाची घोषणा केल्याच्या अवघ्या एक दिवसानंतर केली आहे.

'ख्याल रख्या कर' गाण्याची घोषणा

नेहाने बेबी बंपचा फोटो केला होता पोस्ट

शुक्रवारी नेहाने सोशल मीडियावर खुलासा केला होता की पती, गायक रोहनप्रीत सिंग याच्यासह तिला आपल्या पहिल्या मुलाची अपेक्षा आहे. आपल्या बेबी बंपचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ती खूप चर्चेत होती. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यात तिने प्रेग्नेन्सीची घोषणा केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.

या जोडप्याने यावर्षी ऑक्टोबरमध्ये गाठ बांधली.

"ख्याल रख्या कर" च्या व्हिडिओमध्ये पती रोहनप्रीतसह नेहा दिसली आहे. बबलू यांनी हे गीत लिहिले आहे तर संगीत रजत नागपाल यांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details