मुंबई -बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी 'बोले चुडियां' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीनसोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'बोले चुडियां'च्या सेटवरुन नवाजुद्दीनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. नवाजुद्दीनचा भाऊ शमस नवाब सिद्दिकी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, राजेश भाटिया आणि किरेन झवेरी भाटिया हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.