महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नाशिक सुला फेस्ट : सलीम-सुलेमानच्या संगीतावर थिरकली तरुणाई - नाशिक सुला फेस्ट

गंगापूर धरणाजवळ निसर्गरम्य अशा सुला वाइनयार्ड्स प्रांगणात तेराव्या हंगामातील सुला फेस्ट २०२० ला उस्फूर्त प्रतिसाद मिळला. या संगीत महोत्सवात देश विदेशातील कलाकारांनी आपली कला सादर केली.

Nashik Sula Fest end with Salim Sulaiman Music
नाशिक सुला फेस्ट: सलीम - सुलेमानच्या संगीतावर थिरकली तरुणाई

By

Published : Feb 3, 2020, 8:50 AM IST

Updated : Feb 3, 2020, 1:15 PM IST

नाशिक -दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या 'सुला फेस्ट'चा २ फेब्रुवारीला समारोप झाला. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सलीम-सुलेमान यांची या कार्यक्रमाला विशेष हजेरी होती. त्यांच्या संगीताच्या तालावर वाईन प्रेमींनी मनसोक्त थिरकत गाण्यांचा आनंद लुटला.

नाशिक सुला फेस्ट : सलीम-सुलेमानच्या संगीतावर थिरकली तरुणाई

गंगापूर धरणाजवळ निसर्गरम्य अशा सुला वाइनयार्ड्स प्रांगणात तेराव्या हंगामातील सुला फेस्ट २०२० ला उस्फूर्त प्रतिसाद मिळला. या संगीत महोत्सवात देश विदेशातील कलाकारांनी आपली कला सादर केली. पहिल्या दिवशी ब्रिटिश चार्ट टॉपर यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले.

हेही वाचा -गश्मीर महाजनी - पूजा सावंतची कोळीवाड्यात धमाल बाईक राईड, पाहा व्हिडिओ

सुलाच्या जगप्रसिद्ध वाईन शृंखलेच्या जोडीला सहभागींनी सुला सिलेक्शनच्या माध्यमातून बेलुगा नोबेल, रशिया वोडका, दी बॉटनिस्ट, बडवाईझर अशा विविध पेयांचा वाईन प्रेमींनी आस्वाद घेतला. यंदा सुला फेस्टिव्हलमध्ये दिया वाईन स्पायकलरचे अनावरण करण्यात आले.

नाशिक सुला फेस्ट

नाशिक जिल्ह्याचा एक वेगळा इतिहास आहे. त्र्यंबकेश्वर शिव भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सुला फेस्टला महाराष्ट्रच नाही, तर देशभरातून संगीत प्रेमी येत असतात. संगीत एक अशी गोष्ट आहे जी सर्वांना जोडून ठेवते. सुला सारखे अनेक फेस्टिव्हल झाले पाहिजे, असे सलीम-सुलेमान यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा -'व्हॅलेंटाईन डे'ला शिव - वीणा चाहत्यांना देणार खास सरप्राईझ, पाहा झलक

Last Updated : Feb 3, 2020, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details