मुंबई -दसऱ्याचा दिवस बिग बॉसने सदस्यांसाठी खास बनविला होता. वाद विवाद, भांडण, घरात पडलेले गट सगळे विसरून बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांनी एकत्र येऊन धमालमस्ती केली.
हेही वाचा -गुन्हेगारी व कौटुंबिक ड्रामाचे सुरेख संयोजन सादर करणारी, रोमांचक कथानक सांगणारी सिरीज, ‘तब्बर’!
‘आईचा जोगवा मागेन’ या गाण्यावर महिला सदस्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाची राजगायिका अक्षया अय्यर आणि स्पर्धक विश्वजित बोरवणकर यांनी त्यांच्या सुरेल आवाजात एकसे बढकर एक गाणी सादर केली. त्यानंतर बिग बॉसने जाहीर केले की, आता वेळ आली आहे घराचा नवा कॅप्टन निवडण्याची आणि त्यानंतर सदस्य टास्कमध्ये गुंग झाले. पण, टास्क करताना सदस्य भान हरपून जातात तसेच यावेळीही झाले. कॅप्टनशिपसाठी फाईट होती तीन ती सदस्यांमध्ये, सुरेखा कुडची, स्नेहा वाघ आणि विशाल निकम. टास्कमध्ये भांडण, आवाज चढवणे, एकमेकांना घालून पडून बोलणे हे चालूच असते. तेच यावेळीही बघायला मिळाले. यावेळच्या दोन तासांच्या भागात संपूर्ण घर कुस्तीचा आखाडा बनले होते.
हेही वाचा -लायन्स’ आणि ‘मायनस थ्री’ या डान्स ग्रुप्सनी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेत पटकावले मानाचे स्थान!