मुंबई- टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयने 27 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत सात फेरे घेतले आहेत. मौनीने दक्षिण भारतीय आणि बंगाली संस्कृतीच्या पध्दतीने लग्न केले. मौनी रॉय आणि सूरज यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मौनी रॉयने गोव्यात तिच्या मैत्रिणींसाठी ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. लग्नानंतर मौनीचे फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय पोपटी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये मौनी रॉयच्या हातात मेहंदी आणि कपाळावर सिंदूर दिसत आहे. मौनीने लग्नाच्या वेळी घातलेला काकणांचा चुढा काढला आहे आणि त्या जागी दोन बांगड्या घातल्या आहेत.