महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मौनी रॉयच्या हनिमून फोटोंनी काश्मीरचे तापमान वाढवले

काश्मीरच्या कडाक्याच्या थंडीत मौनीने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करून फोटो काढले आहेत. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे फोटो शेअर करत मौनीने हृदयाला भिडणारे कॅप्शन दिले आहे.

मौनी रॉय हनीमून मोनोकनी फोटो
मौनी रॉय हनीमून मोनोकनी फोटो

By

Published : Feb 10, 2022, 6:55 PM IST

मुंबई - टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सध्या पती सूरज नांबियारसोबत हनीमून एन्जॉय करत आहे. ती तिच्या पतीसोबत काश्मीरच्या खोऱ्यात फिरत आहे आणि तिथून ती तिचे क्यूट आणि कधी बोल्ड फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी मौनीने गुरुवारी (10 फेब्रुवारी) हनिमूनचे असे फोटो शेअर केले आहेत ज्यमुळे काश्मीरसह सोशल मीडियाचा पारा चढत आहे.

मौनी रॉय हनीमून मोनोकनी फोटो

काश्मीरच्या कडाक्याच्या थंडीत मौनीने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान करून फोटो काढले आहेत. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे फोटो शेअर करत मौनीने हृदयाला भिडणारे कॅप्शन दिले आहे. मौनीने या फोटोंवर लिहिले आहे, 'बेबी बाहेर खूप थंडी आहे'.

मौनी रॉय हनीमून मोनोकनी फोटो

इन्स्टाग्रामच्या दुसर्‍या फोल्डरमध्ये फोटो शेअर करत मौनी रॉय लिहिते, 'जर चुंबन बर्फाच्या तुकड्यांसारखे असते तर मी तुला बर्फाचे वादळ पाठवले असते'.

मौनी रॉय हनीमून मोनोकनी फोटो

जेव्हा हे फोटो मौनी रॉयच्या चाहत्यांच्या नजरेस पडले तेव्हा ते बिनदिक्कतपणे लाइक करू लागले. मौनी रॉयच्या अनेक चाहत्यांनी या फोटोंवर काहीही लिहिण्याऐवजी फायर इमोजी शेअर केले आणि ती हॉट दिसत असल्याचे सांगितले.

मौनी रॉय हनीमून मोनोकनी फोटो

मौनी रॉयने 27 जानेवारी रोजी दीर्घकाळचा प्रियकर आणि दुबईस्थित बिझनेसमन सूरज नांबियारशी लग्न केले. मौनीने सूरजसोबत 27 जानेवारीला सकाळी मल्याळी आणि रात्री बंगाली रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधली होती.

मौनीच्या लग्नात फक्त त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र दिसले होते. मात्र या जोडप्याला फिल्मी जगताकडून अनेक शुभेच्छा मिळाल्या होत्या.

हेही वाचा -पाहा व्हिडिओ : अल्लू अर्जुनचे रुपांतर 'पुष्पा'मध्ये कसे झाले?

ABOUT THE AUTHOR

...view details