मुंबई - 'स्टार प्रवाह' वाहिनीवर २५ मार्चपासून 'मोलकरीण बाई- मोठी तिची सावली' ही नवीन मालिका सूरू झाली आहे. मराठी मालिकांमध्येही आता नवनविण प्रयोग व्हायला लागले आहेत. ही मालिकादेखील वेगळ्या विषयावर आधारित आहे. त्यामुळेच या मालिकेच्या पहिल्या भागाचे मालिकेच्या टीमसाठी खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.
'मोलकरीण बाई...' या मालिकेत उषा नाडकर्णी, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे आणि अश्विनी कासार या चार अभिनेत्री मोलकरणीच्या रुपात दिसणार आहेत. त्या काम करत असलेल्या कुटुंबातील महिलांशी त्याचे असलेले संबंध, त्यांच्याशी जुळेलले नाते, आणि त्यांच्याशी वाटणारा मानसिक आधार, यावर या मालिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय भार्गवी चिरमुले, विक्रम गायकवाड, गायत्री सोहम यांच्याही या मालिकेत महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत.
'कुलवधू', 'पुढचं पाऊल' यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन करणारे वैभव चिंचाळकर हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत.