महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मिथुन चक्रवर्ती यांची संघ मुख्यालयाला भेट, कारण अद्यापही गुलदस्त्यात - Mithun Chakravarti in RSS head quarter

आज सकाळी मिथुन चक्रवर्ती यांचं नागपूरला आगमन झालं. त्यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरमध्ये जाऊन डॉ. हेडगेवार आणि गुरुजींच्या स्मृती स्थळाला अभिवादन केलं. भेटीमागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मिथुन चक्रवर्ती

By

Published : Oct 3, 2019, 11:53 PM IST

नागपूर - ज्येष्ठ सिने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयाला सदिच्छा भेट दिली. आज सकाळी मिथुन चक्रवर्ती यांचं नागपूरला आगमन झाल. त्यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरमध्ये जाऊन डॉ. हेडगेवार आणि गुरुजींच्या स्मृती स्थळाला अभिवादन केले. यावेळी संघ कार्याविषयी चक्रवर्ती यांनी जाणून घेऊन प्रमुख संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

मिथुन चक्रवर्ती यांची संघ मुख्यालयाला भेट

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या संगम मुख्यालयातील भेटीमागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. आज अचानक ते संघ मुख्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याची माहिती जाणून घेतली. बराच वेळ त्यांनी संघाच्या रेशीमबाग येथील हेडगेवार भवनात घालवल्यानंतर त्यांनी स्मृती मंदिराला देखील भेट दिली. यावेळी चक्रवर्ती यांनी संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details