मुंबई- मराठी रंगभूमी ही कायम वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी ओळखली जाते. त्यातही कौटुंबिक नाटकांची मोठी परंपरा आहे. दिवसेंदिवस माणसातील नाती बोथट होत असून तो व्यवहारीकपणे जास्त विचार करायला लागला आहे. मग ते बाहेरील जगाबाबत असो वा घरातील वडीलधाऱ्या माणसाबद्दल असो. अशीच आत्मकेंद्रित कुटुंबाची गोष्ट मांडणारे 'मी माझे आणि मला' नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आनंद म्हसवेकरांचं 'मी माझे मला' नाटक लवकरच रंगभूमीवर
प्रत्येक नाटक प्रेक्षकांना काही सांगण्याचा प्रयत्न करत असत. या नाटकातूनही व्यवहारी जगात नात्याची किंमत ठेवण्याचा संदेश देण्यात आला आहे.
यु टर्न, मदर्स डे, यासारखी यशस्वी व्यावसायिक नाटकं देणारे लेखक आनंद म्हसवेकर यांचं 'मी माझे मला' हे नवीन नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते विजय गोखले यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आजवर काही पुनरुज्जीवित नाटकांची निर्मिती केलेल्या किवी प्रोडक्शनने या नाटकाची निर्मिती केली आहे. तर त्यात विजय गोखले, सुरेखा कुडची, विघ्नेश जोशी, हेमांगी राव, किशोर सावंत, विलास गुजर, रोहित मोहिते यांच्या मुख्य भूमिका आहेत.
प्रत्येक नाटक प्रेक्षकांना काही सांगण्याचा प्रयत्न करत असत. या नाटकातूनही व्यवहारी जगात नात्याची किंमत ठेवण्याचा संदेश देण्यात आला आहे. आजवर आशा विषयावर बरीच नाटक आली असली तरीही या नाटकाचं लेखन आणि त्याची मांडणी वेगळी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते नक्की आवडेल, अशी खात्री या नाटकाच्या टीमने व्यक्त केली आहे.