महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

स्वप्नील जोशी म्हणाला, “‘एमएफके’ पुरस्कार सोहळा माझ्यादेखील हृदयाच्या खूप जवळ आहे”! - महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन

झी टॉकिजवर प्रसारित होणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा सन्मान सोहळा आपल्या हृदयाच्या खूप जवळ आहे, असे अभिनेता स्वप्निल जोशीने म्हटले आहे. ज्यावर्षी दुनियादारी चित्रपटासाठी मला नामांकन मिळालं होतं त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला आणि मला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन हे दोन्ही पुरस्कार मिळाले, अशी आठवणही त्याने सांगितली.

Swapnil Joshi
स्वप्नील जोशी

By

Published : Feb 6, 2021, 2:48 PM IST

कौतुक! या पृथ्वीतलावरील सर्वांनाच कौतुक केलेलं आवडत असते. मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना तर काकणभर जास्तच. त्यामुळेच पुरस्कार सोहळ्यांना अतीव महत्व प्राप्त झालेले दिसते. मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तारे-तारकांना दिला जाणारा मानाचा मुजरा म्हणजे ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सन्मान. या सोहळ्याची खासियत म्हणजे यातील ‘फेवरेट’ ठरविला जातो प्रेक्षकांच्या असंख्य मतांचा कौल घेऊन. प्रेक्षक स्वतः महाराष्ट्राचा फेवरेट कलाकार आणि चित्रपट ठरवतो. ‘झी टॉकीज’ ची ही अभिनव संकल्पना मराठी सिनेसृष्टीत चांगलीच नावाजली गेली. प्रेक्षक आणि सिनेसृष्टीला जवळ आणण्यात झी टॉकीज या वाहिनीचा खूप मोठा वाटा आहे.

या पुरस्कारावर अनेक दिग्गज कलाकारांनी आपले नाव कोरले आहे ज्यात महाराष्ट्राचा ‘चॉकोलेट हिरो’, लोकप्रिय रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी याचे पण नाव येते. त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांप्रमाणेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा पुरस्कार सोहळा स्वप्निलच्या देखील हृदयाच्या खूप जवळ आहे.

स्वप्नील जोशी
स्वप्नील जोशीने या पुरस्काराबद्दल म्हणाला. "मी यंदा हा सोहळा एक सूत्रसंचालक म्हणून अजून जवळून अनुभवणार आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? सुवर्णदशक सोहळा हा खूप वेगळा असणार आहे ज्यात नव्या प्रवासाची नंदी आहे. हा सोहळा नेहमीच कलाकारांइतकाच प्रेक्षकांचा सोहळा आहे कारण प्रेक्षक त्यांचे फेवरेट्स निवडतात. या सुवर्णदशक सोहळ्याने फक्त मराठी इंडस्ट्रीत चैतन्य येणार नसून प्रेक्षक आणि सिनेसृष्टीचं नातं अजून दृढ होणार आहे. यंदा ‘एमएफके’ हा सुवर्णदशक सोहळा असल्यामुळे स्पर्धा खूप टफ असणार आहे कारण मागील १० वर्षातील विजेते नॉमिनेटेड आहेत त्यामुळे हा सोहळा खूपच दिमाखदार असणार आहे.” आपल्या आठवणींबद्दल स्वप्नील पुढे म्हणाला, "महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या पुरस्कार सोहळ्याने मला खूप चांगल्या आठवणी दिल्या आहेत. ज्यावर्षी दुनियादारी चित्रपटासाठी मला नामांकन मिळालं होतं त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला आणि मला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन हे दोन्ही पुरस्कार मिळाले. खूप कमी वेळा असं होतं की हे दोन्ही पुरस्कार एकाच कलाकाराला मिळतात आणि ते मला मिळाले त्यामुळे तो खास क्षण महाराष्ट्राचा फेवरेट कोण?ने मला दिला असं मी म्हणेन."अभिनेता स्वप्नील जोशी आणि अमेय वाघ या कार्यक्रमात सुवर्णदशक सोहळ्याची नामांकनं जाहीर करणार असून गेल्या १० वर्षातील ‘एमएफके’च्या विजेत्यांची चर्चा, गप्पागोष्टी आणि बरंच काही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सुवर्णदशकाचा नामांकन सोहळा ७ फेब्रुवारी झी टॉकीज वर प्रसारित करण्यात येणार आहे. हेही वाचा - 'शार्दुल’ आणि ‘सुमी’ ला नेहमीच इच्छा होती चित्रपटातून एकत्र काम करण्याची!

ABOUT THE AUTHOR

...view details