महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुंबईत 'जागतिक मासिक पाळी' दिन साजरा, या अभिनेत्रीही होत्या उपस्थित - menstrual cycle

महिलांना होणाऱ्या मासिक पाळीच्या त्रासात सगळ्यात मोठा अडथळा आहे, तो समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा. हा दृष्टीकोन बदलण्यासाठी 'ती' फाउंडेशनच्या मदतीने अनेक उपक्रम राबविले जातात.

मुंबईत 'जागतिक मासिक पाळी' दिन साजरा, या अभिनेत्रीही होत्या उपस्थित

By

Published : May 30, 2019, 12:56 PM IST

मुंबई -जगभरात २८ मे हा जागतिक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील वर्सोव्यात भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या उपस्थितीत नुकताच हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची मुलगी सारा खान, पत्रकार अलका धुपकर, स्त्रीरोगतज्ञ यांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानतंर मासिक पाळीसंदर्भातील विषयांवर मान्यवरांनी आपली मतं मांडली.

मुंबईत 'जागतिक मासिक पाळी' दिन साजरा, या अभिनेत्रीही होत्या उपस्थित

मासिक पाळी ही निसर्गाचे एक चक्र आहे. याबाबतचे गैरसमज दूर करून मासिक पाळीबाबत बोलण्यात खुलेपणाने बोलले पाहीजे, असे मत त्यांनी मांडले. जोपर्यंत यावर मोकळेपणाने बोलले जात नाही, तोपर्यंत बदल होणे अवघड आहे, असेही त्यांनी व्यक्त केले.

महिलांना होणाऱ्या मासिक पाळीच्या त्रासात सगळ्यात मोठा अडथळा आहे, तो समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा. हा दृष्टीकोन बदलण्यासाठी 'ती' फाउंडेशनच्या मदतीने अनेक उपक्रम राबविले जातात. यामध्ये प्रामुख्याने पॅड बँकेची स्थपना करणे, शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडीग मशीन्स लावणे, गरीब आणि गरजू महिलांना पॅड उपलब्ध करून देणे, जनजागृती करणे, असे अनेक उपक्रम राबवले जातात.

कार्यक्रमाच्या अखेरीस खास केक कट करून हा दिवस साजरा करण्यात आला. मासिक पाळीबाबत सामाजिक परिवर्तनाची लढाई अजून खूप मोठी असली तरीही त्या दिशेने ती फाउंडेशनने टाकलेले पाऊल निश्चितच सकारात्मक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details