मुंबई - 'राजी' चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि दीपिका पदुकोण 'छपाक' चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. दीपिका या चित्रपटात अॅसिड हल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी मला दीपिकाच योग्य वाटली, असे मेघना गुलजार यांनी सांगितले होते. त्यांनी सोशल मीडियावर तिच्यासाठी एक खास पोस्टही लिहिली आहे.
दीपिकासाठी मेघना गुलजार यांनी लिहिली भावनिक पोस्ट - सोशल मीडिया
दीपिका या चित्रपटात अॅसिड हल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी मला दीपिकाच योग्य वाटली, असे मेघना गुलजार यांनी सांगितले होते. त्यांनी सोशल मीडियावर तिच्यासाठी एक खास पोस्टही लिहिली आहे.
मेघना यांनी या पोस्टमध्ये लिहिलयं, की 'दीपिकाला भेटण्यापूर्वी माझ्या मनात अनेक शंका होत्या. ती या भूमिकेसाठी होकार देईल की नाही, तिची काय प्रतिक्रिया असेल, असे प्रश्न मला भेडसावत होते. जेव्हा मी दीपिकाला या चित्रपटाबाबत सांगितले, तेव्हा तिने लगेच होकार कळवला. माझ्याकडे तिच्यासाठी कोणतीही रोमॅन्टिक किंवा हलकीफुलकी कथा असलेला चित्रपट नव्हता. हा चित्रपट अॅसिड हल्यातून वाचलेल्या स्त्रीची कथा आहे. त्यासाठी चेहऱ्यावर अनेक प्रयोग करण्यात येणार आहेत. तरीही दीपिकाने कोणतेही आढेवेढे न घेता चित्रपटासाठी होकार कळवला, त्यासाठी मी तिचे कौतुक करते, असे मेघना यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
मेघना गुलजार यांनी यापूर्वी आलिया भट्टसोबत राजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. तर, दीपिकाच्याही 'पद्मावत' चित्रपटाने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला. आता 'छपाक' चित्रपटातून ती वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.